कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न!

भिवंडी

इंजिनीयर झालेल्या शेतकरी मुलाकडून देशातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे- कपिल पाटील..


अनिल गजरे

भिवंडी तालुक्यातील सर्व शेतकरी यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक ३०/०१/२०२३ सोनाळे भिवंडी येथे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री मा.ना.श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साह संपन्न झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून बाळासाहेबांची शिवसेना भिवंडी ग्रामीणचे आमदार श्री शांताराम मोरे, श्री. सुरेश दादा पाटील (शेतकरी संघटना), भाजपा तालुकाध्यक्ष श्री.पि.के.म्हात्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री अशोक घरत,भिवंडी पंचायत समितीचे सभापती श्री.भानुदास काशिनाथ पाटील, भिवंडी आगरी महोत्सवाचे अध्यक्ष श्री. विशु भाऊ म्हात्रे, भाजपा ज्येष्ठ नेते हरिचंद्र भोईर, दत्तात्रय पाटोळे, श्रीकांत गायकर ,तुकाराम चौधरी, ठाणे जिल्हा मधील फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. नलिनी चौधरी, अनंता पाटील सरपंच ग्रामपंचायत वडपे, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील,अनंता पाटील, रामदास भोईर, विलास भोईर ,मनोहर ठाकरे ,मोहन म्हणेरा व आदी मान्यवर उपस्थितीत होते,


भिवंडी तालुक्यात सध्या बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी आहेत, त्यामुळे शेतीकडे जास्त प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, शहापूर मध्ये एका आदिवासी शेतकऱ्याला सात किलोचा बोकड दिला होता तो ज्यावेळेला शेतकरी मेळाव्यात आला होता त्यावेळेला त्यांनी त्या बोकडाला सोबत घेऊन आला होता मात्र सहा महिन्यात त्या बोकडाचे वजन ५० किलो झाले होते,७०० रुपये किलो प्रमाणे हिशोब केला तर त्या बोकडाची किंमत ३५ हजार रुपये होते असे दहा बोकड पालले तर पुढचा हिशोब तुम्ही लावा, वेहलोली गावातील राजू चुरी या इंजिनियर झालेल्या मुलाने पाली हाउस बनवले आहे, त्यामध्ये त्यांनी फुले लावली आहेत दिवसाला साधारण ५००० फुले तो विकतो, एक फुल पाच रुपये प्रमाणे विकला जातो त्या फुलाला दीड रुपये खर्च येतो, असा इंजिनियर झालेला मुलगा शेतात जाऊन फुलांची शेती करतो अशा मुलाच्या कडून देशातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी असे म्हणायला वावगे ठरू नये,


यासाठी बाजार समितीतून पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत दिली पाहिजे असे मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शेतकरी मेळाव्यात सांगितले, त्याचप्रमाणे जिल्हा सह विकास अधिकारी श्री.टि.के.पानसकर व मंडळ कृषी अधिकारी भिवंडी श्रीमती दयावंती कदम यांनीही उपस्थिततांना योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास पाटील यांनी केले, तर सर्व मान्यवरांचे स्वागत उपसभापती प्रभाकर पाटील व सर्व संचालक मंडळाने केले,


या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोहर तरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे यांनी केले, या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री.विश्वास सपाट (चिराड पाडा),श्री .विजय पाटील (खंबाळा), श्रीमती.माधुरी भोईर( वेढेपाडा ),श्री.अशोक म्हात्रे (कोनगाव), व आदी शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी केंद्रीय मंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला,
हा संपूर्ण भव्य शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ,उपसभापती, सचिव, सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.बिरो रिपोट गावकरी टुडे न्युज भिवंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *