भिवंडीत मुलाचे अपहरण करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक

भिवंडी


भिवंडी शहरातील कामतघर येथून मुलाचे अपहरण करून त्या मुलास शहरातील नवजीवन कॉलोनी मध्ये विकणाऱ्या युवकासह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.


शहरातील भाग्यनगर येथील गृहिणी सुंदरी रामगोपाल गौतम(२८) आपल्या घरात कपडे धुण्याचे काम करीत असताना त्यांचा मुलगा सिद्धांत(१ वर्षे ७ महिने)हा दरवाज्यासमोर खेळत होता. २६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो अचानकपणे घरासमोरून नाहीसा झाल्याने सुंदरी गौतम यांनी शहर पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार केली.


दरम्यान सिद्धांत याच्या बालमनाचा फायदा घेत जवळच एस.पी.टेलरच्या शेजारी राहणाऱ्या गणेश नरसय्या मेमूला (३८) याने सिद्धांतचे अपहरण करून त्यास पद्मानगर नवजीवन कॉलोनी येथील राममंदिरजवळ राहणाऱ्या भारती सुशील साहू(४१) व आशा संतोष साहू(४२) यांना १ लाख ०५ हजार रुपयास सिद्धांत यास विकला.या दरम्यान पोलिसांनी सूत्रे हलवून गुप्त बातमीदारा मार्फत या घटनेचा छडा लावून गणेश मेमुला,भरती साहू व आशा साहू या तिघांना पोलिसांनी अटक करीत मुलास ताब्यात घेतले.असुन मुलाची तपासणी करून स्थानिक पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या उपस्थितीत सिद्धांत यास त्याची आई सुंदरी गौतम यांच्या ताब्यात दिले.

पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 भिवंडी श्री नवनाथ ढवळे यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता भिवंडी शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक .रविद्र पाटील. खाडे. राणे.भोसले.पवार. कोदे.नंदिवाले.हरणे.गावीत. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना संमानित करण्यात आले तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे. शहर पोलीस ठाणे करत आहेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.बिरो रिपोट गावकरी टुडे भिवंडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *