रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांवर बारामती मध्ये हल्ला ,हल्लेखोराला अटक करण्यासाठी दिले पोलिसांना निवेदन 

महाराष्ट्र

प्रतिनिधी रियाज पठाण

      बारामती : दिनांक २५/१/२०२३ रोजी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरुन डॉ. काटे डोळ्याचे हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रोड वरुन रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव मा.प्रशांत विष्णू सोनवणे हे त्यांच्या घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तींकडुन जीव घेना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारणं सोनवणे हे गेल्या १५ वर्षा पासून बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, म्हणून सतत आंदोलन करत आहेत म्हणून याला मारु असं हल्ले खोर आपापसात बोलत होते. असं सोनवणे काल दि.२४/१/२०२३ रोजी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व बारामती शहर पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांना आठ दिवसांत अटक करण्याच्या तर मागणी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, त्या वेळी मा.तुषार विजय गायकवाड पुणे जिल्हा युवा अध्यक्ष मा.गणेश भोसले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.शिवरुद्र धुमाळ बारामती तालुका अध्यक्ष मा.गणेश चव्हाण बारामती शहर अध्यक्ष मा.शिकिदा भोसले बारामती तालुका महासचिव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *