भिवंडी महानगरपालिकातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा,

भिवंडी



देशामध्ये विविध ठिकाणी साजरा केल्या जाणा-या भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास महानगरपालिका उप-आयुक्त दिपक झिंजाड यांच्या उपस्थितीमध्ये मनपाच्या मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारांत मानवंदना देण्यांत आली.


त्यानंतर प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी म्हटले की, प्रजासत्ताक दिन म्हणजेच ज्या दिवशी आपला भारत देशाचा कारभार भारतीय संविधानानुसार सुरु झाला. आपला भारत देश देशभक्तांच्या अथक परिश्रमाने आणि अनेकांच्या प्राणांच्या आहुतींनी स्वतंत्र्य झाला. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर राज्यकारभार चालवण्यासाठी अधिकृत अशी राज्यघटना गरजेची होती. आणि ती आपली ओजळीत टाकण्याचं काम भारत भाग्यविधाता, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि भारत प्रजासत्ताक बनला असे सांगून, भिवंडीतील नागरीकांना, भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा त्यांनी दिल्या.
महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा व जुन्या मनपा कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आय.जी.एम गेट समोरील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयास प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उप-आयुक्त दिपक झिंजाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले तसेच शहरातील विविध राष्ट्र पुरुषांचे पुतळे यांस सुध्दा संबंधित प्रभाग अधिका- यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यांत आले. यावेळी उप-आयुक्त तथा सहा. आयुक्त (जनसंपर्क) प्रणाली घोंगे, सहा. आयुक्त प्रिती गाडे, शहर अभियंता सुनिल घुगे, लेखा अधिकारी किरण तायडे, आणि माजी नगरसेवक, समाजसेवक, भिवंडीतील नागरिक, महानगरपालिकेचे सर्व प्रभाग अधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व शासनाच्या निर्देशानुसार भारताच्या संविधानातील उद्देशिका सरनामा यांचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच तंबाखू मुक्तीची शपथ ही घेण्यात आली व महानगरपालिकेमार्फत मोफत आरोग्य तपासणी कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन प्रशासक तथा आयुक्त म्हसाळ यांनी केले. भिवंडीतील नागरीक, अधिकारी कर्मचारी यांनी त्याचा लाभ घेतला.बिरो रिपोट गावकरी टुडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *