बारामती : (प्रतिनिधी दिपक वाबळे.) बारामती तालुक्यातील कोळोली ग्रामपंचायतच्या वतीने व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. आणी सर्वस्व मसाले यांच्या सहकार्याने कोळोली येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम देऊळगाव रसाळ चे श्री. दिपक बाळासाहेब वाबळे यांनी सादर केला.
मकर संक्रांत निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन कोळोली ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते. चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. च्या वतीने पाहिले बक्षीस पैठणी साडी व दुसरे बक्षीस सोन्याची नथ देण्यात आले होते. तसेस सर्वस्व मसाले , देऊळगाव रसाळ यांच्या वतीने तिसरे बक्षीस म्हणून मसाले गिफ्ट हॅपंर देण्यात आले. प्रश्नमंजुषा मध्ये 50 प्रश्न विचारण्यात आले प्रत्येक महिलेसाठी सर्वस्व मसाले यांच्याकडून भेट वस्तू देण्यात आली. व सर्व महिलांसाठी ग्रामपंचायतच्या वतीने चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सरपंच सौ. पल्लवी प्रमोद खेत्रे यांनी सांगितले. व ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी मोफत रक्त तपासणी , हिमोग्लोबिन तपासणी ,आरोग्य शिबीर घेण्यात आले. तसेच सर्व महिलांना ग्रामपंचायतच्या वतीने हळदी कुंकवाचे करंडे वाटप करण्यात आले.
याठिकाणी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. निलम महेंद्र राऊत , दुसरा क्रमांक मिळवून सोन्याची नथ मिळविली कु. निलम लक्ष्मण काटे व तिसरा क्रमांक मिळवून सर्वस्व मसाले गिफ्ट हॅपंर च्या मानकरी ठरल्या सौ. रुपाली श्रीकांत काळे तसेच सहभागी प्रत्येक महिलेस चंदुकाका सराफ यांच्याकडून मकर संक्रांतीच्या निमित्ताने वान भेट देण्यात आला. जवळपास 300 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या व पुरुषमंडळी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी चंदुकाका सराफ बारामती ब्रांचचे क्लस्टर मॅनेजर श्री. दिपक वाबळे , खाजा शेख , व महिला स्टाफ सहकारी उपस्थित होते. त्याचबरोबर कोळोली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. पल्लवी प्रमोद खेत्रे , उपसरपंच श्री. सतीश काकडे , ग्रामसेवक , सौ. दिपाली लोणकर , तलाठी सौ. अनिता धापटे , रोहिणी खेत्रे , शकुंतला सकट , जयश्री खेत्रे , प्रतीक्षा जाधव , विजय कांबळे , राहुल गोसावी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरो रिपोट गावकरी टुडे
